त्र्यंबकेश्वर – त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती त्र्यंबकेश्वरला उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान विकास परिषदेच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ज्येष्ठ नेते मधुकराव लांडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिला कार्यकर्त्या पुष्पा तिवडे,मनिषा सोनवणे, सुनंदा गांगुर्डे, शीतल दोंदे,पुनम भालेराव, सोनल सोनवणे,यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्रिशरण व पंचशील घेण्यात आली.यावेळी संविधान विकास परिषद अध्यक्ष उमेश सोनवणे यांनी माता रमाई यांच्या आठवणीना उजाळा देतांना सांगतिले की,माता रमाई यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गंभीर साथ होती.शेण गो-या विकून बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी पैसे पाठवत असे,कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट धरला नाही,माता रमाई यांनी समाजासाठी मोठा त्याग करून बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कम पणे उभ्या होत्या.यावेळी मोहन सोनवणे, हरिभाऊ सोनवणे,हिमांशु सोनवणे,रघुनाथ भालेराव, बाळा दोंदे,सुमेद दोंदे,गौरव सोनवणे,करण गांगुर्डे ,हितेश लांडे आदी उपस्थित होते.