“बहुत हुई मॅंहगाई की मार…” अशी घोषणा देणारे भाजपा नेते कुठयं : संपतराव सकाळे
त्र्यंबकेश्वर -भाजपा प्रणित केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्याविरोधात तसेच पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दर वाढीच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर येथे कॉंग्रेसच्या वतीने एक दिवसीय उपोषणास सुरुवात झाली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, तालुकाध्यक्ष संपत सकाळे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश कोठुळे, तालुकाउपाध्यक्ष निवृत्ती महाले, जि. प सदस्या शकुंतला डगळे, जेष्ठ नेते मधुकरराव लांडे, माजी सभापती शांताराम मुळाणे उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या असून संसदेत व केंद्र सरकारकडे विरोधी पक्ष तसेच जनता वारंवार मागणी करून केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या भाववाढीच्या विरोधात केंद्र
२०१४ पूर्वी इंधनाचे दर थोडे वाढले की, “बहुत हुई मॅंहगाई की मार…” अशी घोषणा देणारे भाजपा नेते आता पेट्रोलचे भाव ९० रुपये प्रती लिटरच्या पुढे गेले तरी शांत का असा सवाल काँग्रेस तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी करत केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा शेतकऱ्यांसा
केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी असून २०१४ ला सत्तेत आल्यापासून सरकारकडून शेतक-यांसाठी कुठलाही दिलासादायक निर्णय होत नसल्याची टिकाही यावेळी सकाळे यांनी बोलतांना केली आहे.केंद्र सरकारने याबाबत त्वरित कार्यवाही करून शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घेऊन इंधनाचे दर कमी करावेत अशी मागणीही उपोषण कर्त्यानी केली.यावेळी हरिभाऊ बोडके ,राजाभाऊ पाटील,विधानसभा अध्यक्ष सागर चव्हाण,राजाराम चव्हाण,यशवंत महाले, अरूण वायाळ,संतोष डगळे,अजित सकाळे,सुरेश चव्हाण, गणपत जाधव , सोमनाथ बेंडकोळी ,सिताराम मोरे, योगेश मोरे आदी उपस्थित होते.