त्र्यंबकेश्वर – येथील रिंगरोडवर गुळेवाडी समोर असलेल्या श्री गुरु कार्ष्णि आश्रमातील शिव मंदिरात श्रावण महिन्यात अतिरूद्र अभिषेक पुजा करण्यात आली. विश्वकल्याणासाठी तसेच करोनाच्या महामारीपासून सुटका करावी अशी भगवान शंकरास जपअनुष्ठान करत प्रार्थना करण्यात आली.आश्रमाचे पुरोहित लक्ष्मीकांत थेटे, रतीश थेटे, मयुर थेटे यासह ब्राम्हणांनी येथे अनुष्ठान केले. या अतिरूद्र अभिषेक आणि अनुष्ठानाची सांगता बुधवारी महाप्रसादाने झाली. या अनुष्ठानाच्या दरम्यान आमदार हिरामण खोसकर, नगराध्यच पुरूषोत्तम लोहगावकर , पुरोहित संघ अध्यक्ष व मंदिर विश्वस्त प्रशांत गायधनी, संत निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त ह.भ.प.जयंत महाराज गोसावी यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या व विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली.
असा आहे आश्रम
गुळवेवाडी येथे असलेल्या कार्ष्णिगुरू आश्रमात वेद विद्या अध्ययन करणा-या विद्यार्थ्यांसाठी सुविधा आहे. गेल्यावर्षी येथे शेकडो विद्यार्थी अध्ययन करत होते. गोळाशाळा आणि औषधी वृक्ष संवर्धन असे उपक्रम येथे सुरू आहेत. वृंदावन रमनरेती कार्ष्णि गुरू शरनानंद यांचा हा आश्रम आहे. सिंहस्थ २०१५ कालावधीत तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव वास्तव्यास होते. या आश्रमाच्या परिसरात वृंदावन प्रमाने भव्य राधाकृष्ण मंदिराचे बांधकाम सुरू आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या वैभवात भर घालणारे महत्वपुर्ण कार्य येथे सुरू आहे.