त्र्यंबकेश्वर- भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वरच्या वतीने हरसुल येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत टाळे ठोकून तीव्र आंदोलन केले. कोरोना संकट काळात शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना चार पटीने वीज बिले पाठवून महावितरण कंपनीने जो गलथान कारभार केला, या विरोधात भारतीय जनता पार्टीने सातत्याने आंदोलन करून वीज बिल कमी करून आपला कारभार सुधारण्याची मागणी केली होती.
सातत्याने मागणी करून देखील वीज बिल कमी न करता उलट ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल अशा सूचनेच्या नोटीस पाठविण्यात आल्याने भारतीय जनता पार्टीने या विरोधात राज्यभर महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन पुकारले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला आज भाजपा कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करून सरकार विरोधात घोषणाबाजी करून टाळे ठोकून वीज वितरण कंपनी व राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा निषेध केला. .वीज वितरण उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना नोटिस पाठवणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो… चुकीची वीजबिले पाठविणाऱ्या महावितरण कंपनीचा धिक्कार असो… रद्द करा.. रद्द करा.. चुकीची वीज बिले रद्द करा…अशा घोषणा देऊन यावेळी निदर्शने करण्यात आली.
शरजील उस्मानी यानी हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकून देशविघातक केलेल्या वक्तव्याचा यावेळी शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
या आंदोलना प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे,शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, सरचिटणीस जयराम भुसारे,उपाध्यक्ष रामचंद्र गुंड,भावेश शिखरे,पंकज भुजंग, राहुल शार्दूल,पावन बोरसे,गोकुळ गारे,सागर गमे,दिलीप गोडे,आंबादास गांगोडे,अशोक कुंभार, धनराज खेडुलकर ,सतीश दुसाने ,रामा लहारे, प्रकाश मौळे , राजू गावित,लक्ष्मण भांगरे , रघुनाथ घाटाळ ,व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते