त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर मंदिर आणि संत निवृत्तीनथ महाराज समाधी मंदिराच्या बंद दरवाजा समोर भाजपाने आज घंटानाद अंदोलन केले. साधू-महंतांनी उपस्थित राहून मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी शासनाला आवाहन केले. भाजपाच्या जिल्हा चिटणीस तृप्ती धारणे, तालुका अध्यक्ष विष्णू दोबाडे, शहराध्यक्ष सुयाग वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली या अंदोलनाची हाक दिली होती.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिर चौकात घंटा, टाळ वाजवून मंदिराचे दरवाजे राज्य सरकारने उघडावेत अशी घोषणाबाजी करण्यात आली. दारूची दुकाने उघडी आहेत. परंतु मंदिराचे दरवाजे बंद आहेत याबद्दल षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांनी खेद व्यक्त केला. आखाडा परिषदेचे गणेशनानंद महाराज, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुनील बछाव, नगरसेविका त्रिवेणी तुंगार, अजय दराडे, योगेश मैंद, कमलेश जोशी, नगरसेवक शामराव गंगापुत्र, रविंद्र गांगुले, विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव मुळे, अनिकेत संचेती, श्रीकांत गायधनी यांची उपस्थिती होती.
यावेळेस उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. आस्थे बरोबरच तीर्थक्षेत्र आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथील परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबून आहे. त्र्यंबकेश्वर मधील बहुसंख्यांचे जीवन व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत. आंदोलन यशस्वीतेसाठी सरचिटणीस सचिन शुक्ल, हर्षल भालेराव, ओ.बि.सी. अध्यक्ष प्रविण पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष विराज मुळे यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी नगरसेविका बाळासाहेब कळमकर, पंकज धारणे, भाऊसाहेब झोंबाड, रामचंद्र गुंड, रविंद्र गमे, अभय सरडे, समीर दिघे, मिलिंद धरणे, सुयोग शिखरे, मयूर वाडेकर, सागर गमे, देवयानी निखाडे, उषा शिंगणे, सुनीता भुतडा, संगीता मुळे, नरेंद्र पेंडोळे, सुधीर शिखरे, प्रशांत तुंगार आदी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.