– भ्रष्टाचार संबधी प्रश्न व तक्रारी बाबत पंचायत समिती प्रशासनाकडून कोणतीच कारवाई नाही
– विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा संबंधित अधिकारी समाधानकारक खुलासा करीत नाहीचा आरोप
त्र्यंबकेश्वर – त्र्यंबक पंचायत समितीच्या मागील अनेक सभांमध्ये माजी सभापती ज्योती राऊत व काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या काही ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार संबधी प्रश्न व तक्रारी बाबत पंचायत समिती प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा संबंधित अधिकारी समाधानकारक खुलासा करीत नसल्याने पंचायत समिती सर्वसाधारण सभेमध्ये अगोदर मागच्या सभांमध्ये विचारलेले तसेच मांडण्यात आलेल्या प्रश्नांचा व समस्यांचा खुलासा करा अन्यथा आम्ही सभा तहकूब करु वेळेवर खुलासा न आल्याने शेवटी सभापती मोतीराम दिवे, उपसभापती देवराम मौले यांनी सभा तहकूब केली.
गेल्या काही सभामध्ये ग्रामपंचायत खरशेत, मुलवड व आडगाव देवळा या ग्राम पंचायतींच्या अंतर्गत केलेल्या रस्त्याच्या व इतर विकास कामांचे ई टेंडरींग, प्रशासकीय मान्यता तांत्रिक मंजुरी आदी कार्यालयीन सोपस्कार पार न पाडता थेट काम करुन मोकळे झाले या बाबतीतली अनियमितता केल्या मुळे सभासद चौकशीची मागणी केली होती . तसेच शिरसगाव येथील ४१ शस्त्रक्रियाच्या अनियमितते बाबत झालेल्या स्टींग ऑपरेशनची चौकशी बाबतचा अहवाल अद्याप सदस्यांना पाहवयास मिळाला नाही. तसेच संबंधितांवर काय कारवाई केली याबाबत खुलासा करावा. आणि महत्वाचे म्हणजे ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी स्वतः बीडीओ, एबीडीओ यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे असताना हे होत नसल्याच्या निषेधार्थ पंचायत समिती सभा तहकूब करण्यात आली असल्याचे सभापती दिवे यांनी सांगितले.