त्र्यंबकेश्वर – जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सदस्य पदी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते येथील विनायक माळेकर व बाफणविहीर येथील धीरज पागी यांची निवड झाल्याने खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना नेते समाधान बोडके पाटील, युवा नेते मिथुन राऊत,रघुनाथ गांगोडे,अशोक लांघे,प्रकाश जाधव,लक्ष्मण बरफ,सुनिल साबळे,सरपंच हरी खाडम, संतोष जाधव,चिंतामण बुधर, सुभाष बुधर आदी उपस्थित होते.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सदस्यपदी जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर,शिव सेना उपतालुका प्रमुख तथा बाफणविहीर उपसरपंच धीरज पागी यांना संधी दिल्याने हरसुल भागाला प्रथम न्याय दिल्याने खासदार हेमंत गोडसे यांचे आभार मानले जात आहे.
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, पर्यवेक्षण व संनियंत्रण, उपलब्ध निधीची तरतुद, उपाययोजना, विचार विनिमय व त्याबाबत कार्यवाही होण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा समिती) कार्यरत असून त्यातुन ग्रामीण भागात विकासासोबतच प्रशासनाकडून चांगले काम होणार असल्याने माळेकर व पागी यांच्या निवडीचे हरसुल व ठाणापाडा येथे जोरदार स्वागत करण्यात आले.