त्र्यंबकेश्वर – त्र्यंबेकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजवादी नेते विठोबापाटील तथा विठोबा भाऊ पाटील मेढे यांच्या वयाच्या १०९ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.कै. काकासाहेब वाघ यांचे सहकारी तर कै. विनायक दादा पाटलांचे ते जिवलग होते. आपल्या तत्वावर ठाम राहून आपले म्हणणे समोरच्याला पटेल असे मुद्देसूद मांडणी करून अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते जिवाचे रान करत. भाऊ पाटील.. फर्डे वक्तृत्व.. अंगी बंडखोर वृत्ती अन्याय विरूद्ध यशस्वी लढणारं होते. नाशिक जिल्हा लोकल बार्डात विठोबापाटील दोन वेळा निवडून आले होते..
अंबोली गावच्या ग्रामपंचायतचे पहिले सरपंच होते. त्यानंतरही ते अनेक वर्षे सरपंच राहिले. अंबोली विका सहकार सोसायटीचे संस्थापक चेअरमन होते, अंबोली धरण, अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र, जव्हार डहाणू रस्ता अंबोली गावावरून करून घेण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले होते..वयाची शंभरी गाठण्यासाठी नशीब लागते, त्याचप्रमाणे भाऊपाटील हे १०८ व्या वयापर्यत नाबाद राहात निरोगी आयुष्य जगले. ते सहा भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. प्रतिकूल स्थितीत दररोज ७ कि.मी पर्यंत पायी चालत शिक्षण घेतले. पुढे समाजकारण करत इगतपुरी येथील भाताच्या लेव्ही दरासाठी झालेल्या नाशिक मधील लढ्यात नेतृत्व केले. त्यावेळी सरकार भात खरेदीची सक्ती करत असताना महाराष्ट्रातील शेतक-याला गुजरात पेक्षा कमी दर मिळत. त्यामुळे शेतक-यांवर अन्याय होत असल्याने शेतकरी एकत्र आले काकासाहेब वाघ, पुंजाबाबा गोवर्धने, बाबुराव गोवर्धन, यासह भातपिकवणा-या शेतक-यांनी लढा उभारला. या लढ्यामुळे सरकारला भात मिळणे मुश्कील झाले. विठोबा पाटील यांना नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. त्यांच्या पत्नी सौ. वेणुताईना तुरूंगात टाकण्यात आले. विठोबा पाटील यांच्या समर्थनात गावोगावच्या पाटलांनी राजीनामे देत असहकार नोंदवला. त्यानंतर सरकार नरमले व भाताला योग्य भाव दिला. सह्याद्रीच्या कुशीत स्वकर्तृत्वावर व ध्येयाने समाजात एक कुशलतेची छाप पाडणा-या या स्वातंत्र्यसैनिकांचे वयाच्या १०९ व्या वर्षी निधन झाले.