वाघेरा गणात २.८० कोटी किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
….
त्र्यंबकेश्वर – दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडले तरच ही गावे विकासाच्या प्रवाहात येणार आहेत हे ओळखूनच हरसुल गटात प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचे ध्येय ठेऊन जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांनी काम केल्याने बहुतांश गावे डांबरी रस्त्याने जोडली गेली असल्याने रस्त्यांच्या जाळ्यांमुळे हरसुल गटात विकासाला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते संपतराव सकाळे यांनी केले.
जि.प सदस्या रूपांजली माळेकर यांच्या प्रयत्नातून मजुर झालेल्या पिंपळद _माळेगाव,माळेगाव_हिरडी, वेळुंजे_पिंप्री या वाघेरा गणातील २.८० कोटी किमतीचे तीन महत्त्वपूर्ण रस्ताचे भूमिपूजन संपतराव सकाळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सभापती मोतीराम दिवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, वामन खोसकर, शिवसेना नेते समाधान बोडके,उपतालुका प्रमुख शिवाजी कसबे, तानाजी कसबे,सरपंच तानाजी दिवे,शांताराम गोर्हे ,अजित सकाळे आदी उपस्थित होते.
जेष्ठ नेते संपतराव सकाळे यांनी यावेळी जि.प सदस्या रूपांजली माळेकर यांच्या चार वर्षातील कामाचा उल्लेख करत जेथे रस्ता तेथे विकास, हे गतीमान विकासाचे सुत्र आहे. गटातील प्रत्येक गावात विकास पोहचवण्यात माळेकर यशस्वी झाले आहे. विकास ही सततची प्रकिया आहे. यामुळे मतदाऱसंघातील प्रत्येक गावात दरवर्षी नवनवीन विकासकामे पुर्णत्वास जात आहेत. दर्जेदार रस्त्यांमुळे गावच्या विकासाला खर्या अर्थाने चालना मिळत असून हरसूल गटात प्रत्येक गावच्या सर्वांगिण विकास होत असल्याचे सांगितले. रूपांजली माळेकराच्या प्रयत्नातून रस्ता मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
दळवळण सुकर होणार – माळेकर
पिंपळद _माळेगाव,माळेगाव_हिरडी, वेळुंजे_ पिंप्री हे तिन्ही रस्ते तालुक्यातील एक प्रमुख रस्ते असून या रस्त्यामुळे दळणवळण सुकर होऊन परिसरातील गावे, वाड्या,वस्त्या आणि गावे जवळ आली असल्याचे जि.प सदस्या रूपांजली माळेकर यांनी सांगितले.