नाशिक – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या त्र्यंबकेश्वर उपबाजाराचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जव्हार रोड येथे झालेल्या या सोहळयात मान्यवरांची उपस्थिती होती. माजी खासदार देवीदास पिंगळे यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम जाहीररित्या झाला. या कार्यक्रमास इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती युवराज कोठुळे यांच्यासह संचालक उपस्थितीत होते.