त्र्यंबकेश्वर – प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधुन येथील सुप्रसिध्द युवा चित्रकार इंजि. सिध्दार्थ रविंद्र धारणे यांच्या भारतीय स्थापत्य कलेतील विविध चित्राकृती असलेल्या ‘अनसिन इंडिया’ या ऑनलाइन चित्र प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असुन चित्रप्रेमींना विविध संकेतस्थळावर या चित्र प्रदर्शनाचा लाभ घेता येईल.
भारतीय स्थापत्य कला ही जगभरात कौतुकाचा विषय आहे. कोणतीही यंत्रसामग्री नसतांना केवळ हस्तकौशल्याने बनविलेले मंदिरे, गड किल्ले, बारव अशा विविध वास्तुकला बघितले की, मती गुंग होते. ही स्थापत्य कला बघण्याचं भाग्य सर्वांनाच लाभत नाही. चित्ररुपाने या कलेचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणुन त्र्यंबकेश्वर मधील युवा चित्रकार इंजि. सिध्दार्थ धारणे यांनी यातील काही निवडक शिल्पे अतिशय सुबकपणे कॅनव्हासवर उतरवली.
सध्याच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव नको या कारणास्तव प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधुन ऑनलाइन चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. युनिकाॅल कंपनीचे एम. डी. हेमल चुघ यांचे हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चित्रकार सिध्दार्थ धारणे, ज्योती धारणे, रविंद्र धारणे व मोजका मित्र परिवार उपस्थित होता.
सिध्दार्थ धारणे यांच्या फेसबुकच्या https://www.facebook.com/
या संकेत स्थळावर नागरीकांना याचा लाभ घेता येईल.