त्र्यंबकेश्वर – बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वरचे मंदिर पाडव्याला (१६ नोव्हेंबर) पहाटे ६ वाजता उघडले आहे. दिवसभरात एक हजार भाविकांना दर्शन करता येईल, अशी व्यवस्था मंदिर व्यवस्थापन प्रशासनाने केली आहे. रात्री ८ पर्यंत मंदिर उघडे राहणार आहे. साधारण ८० च्या आसपास भाविक एका तासात दर्शन करु शकणार आहेत. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, हात धुण्याच्या व्यवस्थेबरोबरच सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन या काळात केले जाणार आहे.
त्र्यंबकेश्वर याअगोदर मंदिर पहाटे ६ वाजेपासून रात्री ९ पर्यंत सुरु असायचे. पण, आता दोन तास दर्शनासाठी कमी करण्यात आले आहेत. जास्त गर्दी होवू नये, याची काळजी ट्रस्टने घेतली आहे. दर्शनासाठी पूर्व दरवाजा येथून जाण्यासाठी अंतर ठेऊन चौकोनी मार्क सुद्धा करण्यात आले आहेत.