नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट तसेच मालिकांच्या शूटिंग काही काळ थांबवण्यात आले होते. मात्र राज्य शासनाने त्यास परवानगी दिली आणि नियमांच्या कठड्यात शूटिंग सुरू झाले. याच धर्तीवर शहरात निरनिराळ्या ठिकाणी चित्रपट, मालिका तसेच गाण्यांच्या अल्बमचे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी या भागात अनेक मालिकांचे शूटिंग सुरु आहे. लोकप्रिय अभिनेता चिन्मय उदगीरकर एका गाण्याच्या अल्बमचे शूटिंग सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये करतो आहे. या अल्बममध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री महेक शेख दिसणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकची असलेली ओळख आता शूटिंगच्या निमित्ताने वृद्धिंगत व्हावी यासाठी चिन्मयच्या प्रयत्नातून त्याच्या आगामी गाण्याचे शूटिंग त्रंबकेश्वर येथील कवनाई भागात सुरू आहे. शहरातील वाढत्या शूटिंगच्या संधी पाहता स्थानिक कलाकारांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे. शहरातील अनेक ठिकाणे काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली आहेत. चित्रपट, मालिकांसोबतच आता गाण्याच्या निमिताने त्यांची ओळख व्हावी या उद्देशाने शहरात शूटिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे चिन्मयने सांगितले.