महिला व बालकल्याण सभापतींच्या साहाय्याने अंगणवाडी इमारतीचे कामे मंजूर केल्याचा जि.प सदस्य रमेश बरफ यांचा निर्वाळा
त्र्यंबकेश्वर – त्र्यंबकेश्वर तालुक्यात ठाणापाडा जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी केंद्र इमारत बांधकामासाठी पोषण आहार लेखा शीर्ष मधून कोट्यवधींचा निधी जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाकडून मंजूर झाला असताना या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न एक लोकप्रतिनिधी करीत आहे. मंत्रालयातील कामे मजूर करण्याएेवजी संबंधित लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदच्या कामावर हक्क गाजवून जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकाराचा हक्कभंग करत विकास कामांचे श्रेय लाटl असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ यांनी प्रसिद्धी पत्रक काढून केला.
या पत्रकात म्हटले आहे की, महिला व बालकल्याण सभापती अश्विनीताई आहेर यांच्या सहाय्याने ठाणापाडा गटात अंगणवाडी इमारत साठी कोट्यवधींची कामे आपणच मंजूर केल्याचे पुरावे पत्रकासोबत जोडले आहेत. आम्ही सभापती यांना अंगणवाडी इमारत बांधकाम करण्यासाठी पाठपुरावा केला. तसा पत्र व्यवहार करण्यात आल्याने कामे मंजूर झाल्याचे पत्र सभापती यांनी मला पाठविले असल्याचे रमेश बरफ यांनी सांगितले.
ठाणापाडा गटातील १० अंगणवाडी केंद्र इमारती बांधकाम करण्या करता ग्रामपंचायत कडून प्रस्ताव जमा करून पत्र व्यवहार जिल्हा परिषद सदस्य म्हणून केला असता सदर सर्व कामे मजूर झाली मात्र संबधित लोकप्रातिनिधी स्वतःची कर्तृत्वशून्यता लपवून साधेपणाचा बुरखा पांघरत आहे. या अगोदर ठक्कर बाप्पा योजनेत आम्ही मंजूर केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा लाजीरवाणा प्रकार संबंधिताकडून झाला होता. वेळीच सुधारून ठाणापाडा गटात आम्ही करत असलेल्या कामाचे श्रेय घेणे थांबवा.अन्यथा सभ्यपणाच्या बुरख्याची चिरफाड करायला वेळ लागणार नाही असा सज्जड इशारा बरफ यांनी दिला आहे.
ठाणापाडा गटात दाभोळी, सात्याचा पाडा, डोळओहोल, घोडमानी,रानघर,आडगाव, नांगरबारी, टोकरशेत,हिवाळी या अंगणवाडी इमारत बांधकाम करण्या करता कोट्यवधींचा विकास निधी आणण्यात आला असून ठाणापाडा गटाचा कायापालट करण्याचे माझे स्वप्न असल्याचा निर्वाळा बरफ यांनी दिला.
कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून आणली
ठाणापाडा गटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी सातत्याने पालकमंत्र्या सह जिल्हा परिषदेत संबधित सभापती अधिकारी यांच्या कडे करत असतो. अंगणवाडी इमारती बाबत यशस्वी पाठपुरावा केला. कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून आणली. मात्र एक लोकप्रतिनिधी या कामांचे श्रेय घेत असून संबंधित लोकप्रतिनिधीनी जिल्हा परिषद सदस्य भूमिकेतून बाहेर पडत राज्यस्तरावरून निधी आणत मतदार संघाचा विकास करावा.
– रमेश बरफ, जिल्हा परिषद सदस्य ठाणापाडा