नाशिक – नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जातांना, पहीने फाट्याजवळ उजव्या बाजुला प्रयागतीर्थ नावाचे एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले कुंड आहे. श्रावण महीन्यात होणारी ब्रम्हगिरी फेरी त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तापासून पहाटे सुरु होते आणि ऐन सुर्योदयाच्या वेळेस असंख्य शिवभक्त याच प्रयागतीर्थ कुंडाची प्रदक्षिणा पुर्ण करुन पहीने मार्गावर फेरीसाठी पुढे मार्गस्थ होतात. हे प्रयागतीर्थ यंदाच्या पावसाळ्यात तुडूंब भरले असून हिरवाईने नटलेल्या सभोवतालच्या निसर्गात आणि निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर अतिशय नयनरम्य दिसत आहे. बघा, याच प्रयागतीर्थ कुंडाचा जगदिश देवरे यांनी काढलेला व्हिडीओ.