त्र्यंबकेश्वर – गणेश चतुर्थी आणि ऋषी पंचमीस भगवान ञ्यंबकेश्वरास पोषाख पुजा करण्यात आली आहे. पाच महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडले नाहीत. मात्र १० दिवसांपासून लाईव्ह दर्शन सुरू झाले आहे. भगवान त्र्यंबकेश्वराजाची दररोज दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रदोष पुष्प पुजा आराधी गुरूजी करत असतात. भगवान त्र्यंबकराजास दररोज प्रदोषकाळात पुजा करून पुष्प शृंगार करतात. मात्र, सणवार असतांना ञ्यंबकराजास पोषाख करत असतात. दिवाळी आणि गुढीपाडव्यास सुवर्ण मुखवटा ठेवण्यात येतो. गणेश चतुर्थी आणि ऋषी पंचमी या दोन दिवस पोषाख पुजा होत आहे. गणेश चतुर्थीस प्रदोष पुष्प पुजक हरीओम उल्हास आराधी यांनी ही पुजा केली. त्यावेळी पुजारी सुशांत तुंगार हे गर्भगृहात होते. या पुजेचे सर्वाधिक दर्शन घेतले गेले.