नाशिक – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नाशिककरांचे खास आकर्षण असलेला दीपोत्सव यंदा स्थगित करण्यात आला आहे. तसा निर्णय शंकराचार्य न्यासने घेतला आहे.
शंकराचार्य न्यासने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिरात दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमा दिपोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा स्थगित करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी येत्या रविवारी (२९ नोव्हेंबर) रोजी बालाजी मंदिरात दिपोत्सव साजरा होणार नाही. सर्व भाविकांनी आपापल्या घरीच दिपोत्सव साजरा करावा, असे आवाहन व विनंती सर्व भाविकांना विश्वस्थ मंडळातर्फे करण्यात आली आहे.