त्र्यंबकेश्वर – येथील तलाठी कॉलनीतील राजयोग सेवा केंद्र तर्फे ६ सप्टेंबर रोजी नाशिक उपक्षेत्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका संगीता भांगरे या उपस्थित होत्या. याप्रसंगी ब्रम्हाकुमारी ज्योती दीदी यांनी राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात आलेल्या क्लीन द माइंड ग्रीन द अर्थ`
या उपक्रमाची माहिती दिली. नाशिक सबझोन तर्फे गेल्या वर्षी तब्बल ८० हजार झाडे लावून नाशिक सेवा केंद्र पूर्ण भारतात प्रथम आल्याचे ज्योती दीदी यांनी या प्रसंगी नमूद केले. त्र्यंबकेश्वर येथील सेवा केंद्राचे चालक अंजली माता व आनंदभाई यांनी दिदींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप यांनी तर आभार प्रदर्शन निर्मला माता यांनी केले. प्रसंगी नाशिक येथून आमंत्रित संस्थेच्या युवा साधकांनी त्र्यंबकेश्वर मधील विविध ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व मास्क लावून विविध जातीच्या ४० वृक्षांची लागवड केली. या प्रसंगी त्रंबकेश्वर परिसरातील शरद नाशिककर, सुधाकर सोनवणे यांच्यासह निवडक साधक उपस्थित होते