डोनेट अ डिव्हाईस उपक्रमांतर्गत आतापर्यत मिळाले ३८७ स्मार्ट फोन, २८८ साधे फोन, ८९ टॅबलेट, ४०२ पेन ड्राईव्ह, ६५ टी.व्ही, ५२ संगणक, १५ लॅपटॉप,१९१९ रेडिओ, ५ प्रोजेक्टर, २७४ स्पिकर्स, एम्प्लीफायर एकुण ४०४१ वस्तु मिळाल्या.
नाशिक – कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेच असल्याने ‘शाळा बंद मात्र शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या डोनेट अ डिव्हाईस उपक्रमांतर्गत मुंबई येथील पारीख परिवाराने त्रंबकेश्वर तालुक्यातील ६ शाळांसाठी ३६ टॅबलेट उपलब्ध करुन दिले आहेत.
माहे जून २०२० पासून शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे अद्याप एकही शाळा सुरु करण्यात आलेली नाही. मात्र विविध ठिकाणी व्हॉटसअप,तसेच ऑनलाईनव्दारे शिक्षकांकडून अध्यापनाचे काम करण्यात येत आहे. जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या उददेशाने जिल्हा परिषदेने डोनेट अ डिव्हाईस चळवळ सुरु केली आहे. तसेच डोनेट अ बुक उपक्रम देखील राबविण्यात येत आहे. डोनेट अ डिव्हाईस उपक्रमांतर्गत आतापर्यत ३८७ स्मार्ट फोन, २८८ साधे फोन, ८९ टॅबलेट, ४०२ पेन ड्राईव्ह, ६५ टी.व्ही, ५२ संगणक, १५ लॅपटॉप,१९१९ रेडिओ, ५ प्रोजेक्टर, २७४ स्पिकर्स, एम्प्लीफायर इ. असे एकुण ४०४१ वस्तु समाजातील दानशुर व्यक्ती, संस्था यांनी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबई येथील सेजल पारीख व समिर पारीख यांनी त्रंबकेश्वर तालुक्यातील ६ शाळांसाठी ३६ टॅबलेट उपलबध करुन दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पारीख यांचे अभिनंदन केले आहे.