नाशिक – नाशिक जिल्हा रूग्णालयातील बालरोग तज्ञांनी शर्थीने प्रयत्न करुन देखील पालघरच्या नवजात बाळाची परिस्थिती नाजूक असल्या कारणाने ५ जून रोजी पहाटे सदर बाळाचा मृत्यू झाला. मृत्यू हा श्वास घेण्यास त्रास होणे आणि इतर अवयवांची वाढ न झाल्याने तसेच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने झाला आहे. या बालकाच्या आईचा कोविड टेस्ट निगेटिव्ह आणि जव्हार सरकारी रुग्णालयातील बाळाचे रँपिड तसेच आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्याने सदर मृत्यु कोविड मुळे झालेला नसल्याचा खुलासा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केला आहे.
त्यांनी या नवजात मृत्युबाबत घटेबाबत सविस्तर सांगितले की, अश्विनी अशोक काटेला रा. दरशेत ता.जि.पालघर या महिलेस ३१ मे रोजी कांता हॉस्पिटल पालघर येथे प्रसूती होऊन केवळ १.३ किलोचे स्त्री जातीचे मूल जन्माला आले. बाळ जन्मतः कमी वजनाचे असल्याने अशा बाळांना लो बर्थ वेट (LBW) संबोधण्यात येते. खाजगी रूग्णालयात रँपिड टेस्ट केली असता ती पाँझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. परंतु तसे कोणतेही कागदपत्र नव्हते. बाळाची नाजूक स्थिती बघता त्यांना त्वरित जव्हार येथे सरकारी रुग्णालय दाखल करण्यात आले. बाळाला श्वास घेण्यास त्रास होता.जव्हार येथील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बाळाची व आईची दोघांचीही कोविड रॅपिड आणि rt-pcr तपासणी करण्यात आली. दोघांचाही चाचण्या निगेटिव आल्या. बाळाची परिस्थिती आणखी खालवल्याने२ जुन रोजी जिल्हा रूग्णालय नाशिक येथे संदर्भित करण्यात आले. सदर बाळ हे जन्मतः कमी वजनाचे असल्या कारणाने अशा बाळांची फुप्फुसांची वाढ पूर्णपणे होत नाही आणि त्यामुळे अशा बाळांना श्वास घ्यायला त्रास होतो तसेच या बाळास Sclerema असल्या कारणाने (हा एक प्रकारचा जंतुसंसर्ग असतो) लहान बाळांमध्ये बऱ्याच वेळा दिसून येतो. बाळाला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आणि सर्वोपचार करण्यात आले होते असेही डॅा. थोरात यांनी सांगितले.