नरसपुरा येथील व्हिस्ट्रॉनच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर सदर पाऊल उचलण्यात आले आहे. विस्ट्रॉनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही कर्मचाऱ्यांना पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे आणि कामकाजातील काही परिस्थितीमुळे कर्मचार्यांनी ही पावले उचलली आहेत. कंपनीनेही आपल्या निवेदनात सर्व कर्मचार्यांची माफी मागितली सुधारात्मक कारवाई पूर्ण होण्यापूर्वी अमेरिकेतील अॅपल कंपनीकडून कोणताही नवीन व्यवसाय मिळणार नाही.
दरम्यान, अॅपल यांनी नियुक्त केलेल्या स्वतंत्र लेखा परीक्षक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, प्लांटमध्ये झालेल्या घटनेची चौकशी सुरू असली तरी प्राथमिक तपासात त्याच्या पुरवठादाराने नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये काही कामगारांना पगार देण्यास विलंब झाल्याने सदर घटना घडली आहे.