नाशिक – नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी नुकतीच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशासाठी एकूण बाराशे विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी १४२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. नव्याने या प्रवेशीत चिमुकल्या बालकांचा प्रवेशोत्सव नुकताच साजरा करण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव ही ऑनलाइन परंतु मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्राचार्य देवेंद्रकुमार ओलावत यांनी सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेतर्फे कोरोना काळात ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही खंड केला जाणार नाही. अत्यंत अद्ययावत पद्धतीने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शाळेचे शिक्षक शिकवत आहेत. सर्व पालक समाधान व्यक्त करीत आहेत, अशी माहिती यावेळी प्राचार्य ओलावत यांनी दिली. मुख्याध्यापिका सुभद्रा नायर यांनी शाळेच्या परिसराचा तसेच मागील वर्षात संपन्न झालेल्या विविध उपक्रमाचा सुंदर व्हिडीयो दाखवला. हा कार्यक्रम गूगल मीट वर घेण्यात आला. यावेळी नंदिनी भगत, आरीफ बेग, पूजा दहिया, गीता, खुशनुमा, मोनिका , रोहीत सिंग, आदि शिक्षक, सर्व पालक व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
My school is number one school of world