ताइपेई – तैवान हा देश सध्या चीनकडून कोरोना लस आयात करत असून ही लस घेण्यास तैवानच्या ६७ टक्के नागरिकांनी नकार दर्शविला आहे. तर, केवळ २४.३ टक्के लोकांनी ही लस घेण्यास सहमती दर्शविली आहे.
तैवान टाइम्सच्या वृत्तानुसार, ६७ टक्के लोकांनी सदर चीनी कोरोना लस घेण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे, तर २७.१ टक्के लोकांनी आम्हाला अजिबात देऊ नका आणि ३९.९ टक्के लोकांनी कोणत्याही परिस्थिती कोणीही लस घेऊ नये, असे म्हटले आहे.
फोकस सर्व्हे रिसर्चने हे सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात स्ट्रॅटेजिक स्टडी सोसायटीचे प्रमुख व तामकाँग विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक वांग कु यी म्हणाले की, चीनने या लसीशी संबंधित वैज्ञानिक डेटा पुरविला नाही, त्यामुळे लोक लस घेत नाहीत हे एक मुख्य कारण आहे.
तसेच या सर्वेक्षणात असे ५.४ टक्के लोक आहेत ज्यांनी असे म्हटले आहे की जर तैवानने चीनकडून या लसी मागवल्या तर त्यांना लस आता नक्कीच मिळेल. तैवान आणि चीनने आणखी कोरोना लसीसाठी वाटाघाटी सुरू केल्या पाहिजेत, असे ७७.९ टक्के लोकांनी सांगितले. तर १३.७ टक्के लोकांनी अशी कोणतीही अपेक्षा केली नाही .