बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तेलंगाणाच्या धर्तीवर नाशकात उपसा सिंचन प्रकल्प

by India Darpan
सप्टेंबर 21, 2020 | 3:27 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
13BMCHHAGANBHUJBAL

नाशिक – जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून जात असते; हे जाणारे पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते महाराष्ट्रात कसे राहील याकडे लक्ष देण्यात यावे; अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भुजबळ फार्म येथे झालेल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आढावा बैठकीत ते बोलत होते. तेलंगणास्थित कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील प्रकल्पांचा आराखडा सादर करण्यात यावा तसेच जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांसाठी सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक कसा करता येईल याकडे लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचना भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नाशिक मुख्य अभियंता अलका अहिरराव, अहमदनगर मुख्य अभियंता अरुण नाईक, धुळे अधीक्षक अभियंता आमले, ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूर मध्यमेश्वर कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्राधान्याने ते पूर्ण करा जेणेकरून त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होईल. यामध्ये मांजरपाडा सह प्रवाही वळण योजनांसाठी प्राधान्य देण्यात यावे, आणि त्यानुसार उर्वरित इतर योजनांची मांडणी करण्यात यावी असे निर्देश श्री भुजबळ यांनी दिले.
सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे यासोबतच नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता या स्वतंत्र पदाची निर्मिती विचाराधीन असून त्याचे कार्यालय नाशिक येथे निर्माण करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही पालकमंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उत्तर महाराष्ट्रात १ लाख ३२ कोरोनामुक्त; बरे होण्याचा दर ८१.७४ टक्के

Next Post

नाशिक-मुंबई मार्गावरील हा अडथळा दूर; उदघाटनाअभावीच सेवेत

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक-मुंबई मार्गावरील हा अडथळा दूर; उदघाटनाअभावीच सेवेत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011