नवी दिल्ली – माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, असा धक्कादायक दावा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला आहे. या गौप्यस्फोटानं खासदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. मागणी केलेली नसताना माझ्या घरासमोर पोलिस तैनात करण्यात आले आहेत, असं मोईत्रा यांनी म्हटलं आहे. याबद्दल त्यांनी ट्विटर अकाउंटवरून ट्विट केलं आहे. दिल्लीच्या निवास्थानाबाहेर तैनात केलेल्या पोलिसांचे छायाचित्र त्यांनी ट्विट केलं आहे.
दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव आणि बाराखंबा रोड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी पोलिस सुरक्षा हटवण्याची मागणी केली आहे. दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानाबाहेर शुक्रवारी रात्री दहाला सीमा सुरक्षा दलाचे तीन सशस्त्र जवान त्यांच्या घराबाहेर नेमले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
Our brave young men sign up for the BSF to guard India’s borders – using them for durwan duty outside my home is a bit silly, isn’t it, @CPDelhi , @MHAIndia pic.twitter.com/LViFEu2HOt
— Mahua Moitra (@MahuaMoitra) February 13, 2021