सोलापूर – तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या २४ पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाने कारवाई केली आहे. यात ८ पुजाऱ्यांना ३ महिने मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर, १६ पुजाऱ्यांना सहा महिने बंदीची कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
देवी मंदिरात नियोजित जबाबदारी नसतानाही गाभाऱ्यात प्रवेश केल्याबद्दल, सहा महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदी का करु नये, अशा प्रकारच्या कारणे दाखवा नोटिसा १६ पुजाऱ्यांना बजावल्या आहेत. तर, ८ पुजाऱ्यांना ३ महिन्यांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तशी माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली आहे.