नवी दिल्ली – केंद्र सरकारने सर्व जनतेला कोरोना लस मोफत द्यायला हवी. तशी आमची आग्रही मागणी आहे. जर, केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला नाही तर दिल्लीत आमचे सरकार मोफत लस देईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. अनेक वर्षानंतर अशा प्रकारची गंभीर महामारी आली आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन जनतेला दिलासा द्यायला हवा आणि कोरोना लस मोफत द्यायला हवी, असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, या घोषणेद्वारे त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला खिंडीत गाठले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.