नाशिक – कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता सर्व क्षेत्रातील डॉक्टर महत्वाची भूमिका बजावत आहेत. आयुर्वेद शास्त्रानुसार आता कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. आयुर्वेदातील उपचारांमुळे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण बरे होत असल्याने आता आयुर्वेदिक वैद्यांची सूची तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याद्वारे कोरोना रुग्ण तसेच सर्वसामान्य लोकांना मदत होणार आहे. कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करणारे वैद्य यात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी ८ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
कोरोना महामारीच्या काळात होमियोपॅथी बरोबरच आयुर्वेद शास्त्राद्वारे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. बहुतांश रुग्ण यातून बरे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुर्वेद शास्त्राचा उपयोग करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यांची सूची तयार करण्याचे काम आयुर्वेद विद्यार्थी संचलित, संहिता वाचन समुहाने हाती घेतले आहे. यात आयुर्वेदिक डॉक्टरांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. याद्वारे सर्वसामान्य लोकांना मदत होणार असल्याचे आयुर्वेद विद्यार्थी संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांना शुद्ध आयुर्वेद चिकित्सा देणाऱ्या डॉक्टर्सने यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी https://forms.gle/