नवी दिल्ली – फार वर्षापूर्वी गुजरातमधील एक शक्तिशाली शासक महमुद बेगडा हे आपल्या प्रचंड आहारासाठी प्रसिद्ध होते. इटली, पोर्तुगालमधील पर्यटकांकडूनही या शासकाच्या भरपूर अन्नाचा उल्लेख आलेला दिसतो.
सर्वसामान्य माणसापेक्षा कुस्तीपटू थोडे जास्त अन्न खातात, परंतु मेहमूद बेगडा एका दिवसात 35 किलो खात असत. मेहमूद बेगडा खूप खायचे आणि पचवायचे. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा राजा रोजच विषाची देखील चव घेत असे.
बेगडा वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सिंहासनावर बसले आणि त्यांनी 52 वर्षे यशस्वीपणे गुजरातवर राज्य केले. त्याच्या घराण्याचा सर्वात शक्तिशाली शासक मानला जात असे. महमूद बेगडा यांची मिशा देखील खूप मोठी होती. पोर्तुगीज पर्यटक त्यांच्या मिश्यांबद्दल सांगत असत की, त्या इतके लांब असत की, त्यांना राजा डोक्यावर बांधायचे.
महमूद बेगडा यांचे खरे नाव महमूद शाह प्रथम होते. “गिरनार” जुनागड आणि चंपानेरचा किल्ला जिंकल्यावर त्यांना ‘बेगडा’ ही पदवी देण्यात आली. असे म्हणतात की, गिरनार किल्ला घेतल्यानंतर इथल्या राजाने इस्लाम धर्म स्वीकारला, त्यानंतर त्याच्या सैन्याचा सुलतानाच्या सैन्यात समावेश करण्यात आला. गुजरातच्या या सम्राटाचा आहार जगभर प्रसिद्ध होता.
असे म्हटले जाते की, राजा रोज न्याहारीसाठी एक वाटी मध, एक वाटी लोणी आणि १०० केळी खात असत. एवढेच नाही तर रात्री उशीच्या दोन्ही बाजूंनी जेवणही ठेवले जात होते, जेणेकरून जर त्याला भूक लागली, तर ताबडतोब खाऊ शकेल.
काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, महमूद बेगडा यांना लहानपणापासूनच रोज कोणती तरी थोडे थोडे विष खायला देत होते, त्यानंतर ते दररोजच्या अन्नाबरोबर काही प्रमाणात विष घेत असत. त्यामुळे राजाच्या शरीरावर इतके विष पसरले होते की, माशी जरी त्याच्या हातावर बसली तर, तीही एका क्षणात मरण पावत असे, इतकेच नाही, तर त्यांच्या वापरलेल्या कपड्यांना कोणीही स्पर्शही करीत नसे, कारण बेगडा परिधान केलेले कपडेही विषारी बनले होते.