नवी दिल्ली – बँकांमध्ये दरोडेखोरी संबंधित अशा अनेक घटना आपण ऐकल्या असतील, ज्यात दरोडेखोरांनी केवळ लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपयांची लूट केलेली असते. परंतु जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा बँक दरोडा जाणून सर्वांना आश्चर्य वाटेल, कारण त्या दरोड्यात या देशाच्या राष्ट्रपतींचा मुलगा देखील थेट सामील होता.
वास्तविक ही घटना इराकची असून १८ वर्षांपूर्वी एका सेंट्रल बँकेतून साडेसात हजार कोटींपेक्षा जास्त रूपयांची लूट झाली होती. मार्च २००३ मध्ये ही घटना घडली, तेव्हा सद्दाम हुसेन इराकचे राष्ट्रपती होते. सद्दाम हुसेन याचे अमेरिकेतील शत्रुत्व सर्वश्रुत आहे.
तेव्हा इराकवरील हल्ल्यासाठी अमेरिकेने पूर्ण तयारी केली होती. त्याआधी काही तासांपूर्वी सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसे बगदादमधील इराकी सेंट्रल बँकेत आला आणि बँकेच्या प्रमुखांना सांगितले की, सुरक्षा कारणास्तव राष्ट्रपतींनी बँकेचे सर्व पैसे दुसर्या सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश दिले आहेत.
