नवी दिल्ली – जगात अशा अनेक गोष्टी किंवा जागा आहेत ज्या रहस्यमय असून हजारो वर्षांपासून कोणालाही त्या बद्दल फारसे माहित नव्हते. आता असे दिसते की, येत्या काही वर्षांमध्ये त्याबद्दल लोकांना काही विशेष माहिती होणार नाही. जगातील अशा एका रहस्यमय स्मारकाबद्दल जाणून घेऊ या…
आयर्लंडमधील काउंटी मॅथमध्ये एक प्रागैतिहासिक स्मारक असून बायरन नदीच्या उत्तरेस ड्रोगेडापासून आठ किलोमीटर पश्चिमेला आहे. त्याचे नाव न्यूग्रेंज असून ते निओलिथिक कालावधीत एक प्रकारे अपवादात्मक भव्य स्मारक बांधले गेले आहे.
ते जगातील प्रसिद्ध स्टोनहेंज आणि इजिप्तच्या पिरॅमिड्सपेक्षा बरेच जुने आहे. सदर स्मारक इ.स. पूर्व ३२०० वर्ष जुने असल्याचे मानले जाते. सदर रहस्यमय स्मारक एका मोठ्या गोलाकार टेकडीसारखे आहे, ज्यामध्ये अंतर्गत दगडी रस्ता आणि खोल्या आहेत.
या स्मारकात मानवी अस्थी व्यतिरिक्त इतर भयानक वस्तूही सापडल्या आहेत. येथे उत्खननात जळलेल्या आणि अर्ध्या भाजलेल्या अवस्थेत मानवी हाडे सापडले आहेत, ज्यात स्मारकांच्या आत मानवी मृतदेह ठेवण्यात आले होते, त्यातील काहींवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या स्मारकाचे एक प्रकारे धार्मिक महत्त्व होते, कदाचित येथे एकप्रकारे उपासना होत असावी . परंतु, हे स्मारक कोणत्या कामासाठी वापरले जात होते आणि कोणी बांधले हे कोणालाही माहिती होऊ शकलेले नाही, अर्थात हे आजपर्यंत रहस्यच राहिले आहे.
या जागेचा शोध फार पूर्वी लागला होता, त्यानंतर १९६२ ते १९७५ पर्यंत येथे खोदकाम चालू होते आणि त्याबद्दल काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. या स्मारकामध्ये १ मीटरचा रस्ता असून तो केवळ हिवाळ्यातील सूर्योदयानंतरच प्रकाशित होतो, हे देखील एक गूढ आहे.