नवी दिल्ली – भारतात ८० आणि ९० च्या दशकात मनोरंजनाकरिता ऑडिओ कॅसेट टेपचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असे. त्यानंतर भारतात सीडीच्या वापरास वेग आला. सर्वप्रथम ऑडिओ कॅसेट टेप आणि सीडी या डच अभियंता लू ओटन्स यांनी बनविल्या.
जगातील पहिली ऑडिओ कॅसेट लू ओटन्स यांनी त्यांच्या कारखान्यात तयार केली होती. गेल्या ६ मार्च रोजी ओटन्स (वयाच्या ९४ व्या वर्षी) यांचे निधन झाले. ते नेदरलँडचे रहिवासी होते. मात्र, त्यांच्या आकस्मिक मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.








