नवी दिल्ली – जगभरात अनेक भयानक युद्ध झाले. त्यात लाखो लोकांचा बळी गेला. आपल्या राज्याचा विस्तार करण्याचा या सर्व युद्धामागील हेतू एकमेव होता. परंतु शेकडो वर्षांपूर्वी एक युद्ध झाले, त्यामागील कारण फक्त एक बादली होती. आपल्याला ही गोष्ट नक्कीच विचित्र जाणवत वाटत असेल, पण ती गोष्ट खरी आहे.
वास्तविक ही घटना इ.स. १३२५ ची आहे, त्यावेळी इटलीमध्ये धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. बोलोग्ना आणि मोडेना या दोन राज्यांमध्ये सतत भांडणे होत. कारण बोलोग्नाला ख्रिश्चन पोपचा पाठिंबा होता, तर मोडेनाला रोमन सम्राटाचा पाठिंबा होता.
बोलोग्नातील लोकांचा असा विश्वास होता की पोप हा ख्रिश्चन धर्माचा खरा स्वामी होता, तर रोमन सम्राट हा खरा मालक असल्याचे मोडेनाचे लोक मानत असत. इ.स. १२९६ मध्ये बोलोना आणि मोडेना यांच्यात यापूर्वी लढाई चालू होती. तेव्हापासून दोन्ही राज्यांमध्ये नेहमीच तणाव होता.
इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, रीनाल्डो बोनाकोल्सीच्या कारकिर्दीत मोडेना अधिक आक्रमक झाली आणि वारंवार बोलोग्नावर आक्रमण केली. इ.स. १३२५ मध्ये जेव्हा काही मोडेना सैनिक शांतपणे बोलोना किल्ल्यात घुसले आणि तेथून त्यांनी लाकडाची एक बादली चोरली, तेव्हा दोन राज्यांमधील हा तणाव होऊन मोठ्या लढाईत त्याचे रूपांतर झाले.









