मुंबई – जर आपण भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) ग्राहक असाल तर ही बातमी आपल्या कामाची आहे. देशात सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वांत मोठ्या बँकेने ट्वीट करून आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की जर आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यात अडचणी येत असतील तर पॅन कार्डशी संबंधित माहिती अकाऊंटमध्ये अपडेट करा.
या ट्वीटसोबत बँकेने एक फोटोही जोडला आहे. या फोटोत नमूद केले आहे की एटीएम, पीओएस/ई-कॉमर्सच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनसाठी आपल्या एसबीआय डेबिट कार्डचा वापर करण्यासाठी कृपया पॅनची माहिती बँकेत अपडेट करून घ्यावी.
कसे करावे अपडेट
बँकबाजार डॉट कॉमनुसार कुठलाही एसबीआय ग्राहक आफलाईन किंवा आनलाईन या दोन्ही माध्यमांतून एसबीआय अकाऊंटसोबत पॅन कार्ड लिंक करू शकतो. अकाऊंटसोबत पॅन लिंक करण्यासाठी www.onlinesbi.com वर जाऊन My Accounts या आप्शनमध्ये खाली Profile-Pan Registration वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक नवे पेज पुढे येईल. यावर आपला अकाऊंटनंबर निवडून त्यानंतर पॅन नंबर टाकावा. पुढे सबमीट बटणवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अकाऊंट नंबरमध्ये पॅननंबर लिंक करू शकता.