नवी दिल्ली – गुगलतर्फे जीमेल धारकांसाठी १ जून २०२१ पासून नवे धोरण लागू होणार आहे. नव्या नियमांच्या आधारे तुमचे जीमेल अकाउंट देखील बंद होऊ शकते. नव्या नियमांच्या आधारे गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटो दोन वर्षापासून वापरात नसेल किंवा दोन वर्षापेक्षा जास्त दिवस निष्क्रिय असेल तर संबंधित सर्व माहिती नष्ट केली जाणार असून अकाउंट बंद केले जाणार आहे.
एवढेच नव्हे तर, जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटो या सुविधा कायम करण्यासाठी त्यांचा वापरावर भर द्यावा लागणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच कोणतेही अकाउंट काढून टाकण्याआधी वापरकर्त्यांना त्याबाबत माहिती दिली जाणार आहे.
पूर्वसूचना दिल्याशिवाय कोणतेही अकाउंट डिलीट होणार नाही असे कंपनीने संगितले आहे. जर तुम्हाला तुमचे जीमेल अकाउंट सुरू ठेवायचे असेल तर त्याचा वापर वाढवणे, तसेच वेळोवेळी अपडेट करणे अनिवार्य आहे.