मेष, वृषभ, मिथुन राशी असणाऱ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी टिप्स
सर्वप्रथम मेष राशीतील अश्विनी, भरणी, कृतिका नक्षत्रांसाठी टिप्स
-
मेष रास असणाऱ्यांनी महत्त्वाच्या वेळी आपल्या नियमित आवाजापेक्षा थोड्या हळू आवाजात बोलावे.
-
आपणास आलेला राग सौम्य शब्दात व्यक्त करण्यास शिकावे.
-
आपल्या तापट स्वभावाने जवळची माणसे दुरावू देऊ नये.
-
समोरच्या व्यक्तीची चूक दाखवताना चार-चौघात पाणउतारा करू नये.
-
सहकाऱ्यांच्या चांगल्या गुणांची चर्चा करावी.
-
सार्वजनिक जीवनात आपल्या मूळ स्वभावाला थोडी मुरड घातल्यास आपण जरूर यशस्वी व्हाल.
-
****
वृषभ राशीतील कृतिका, रोहिणी आणि मृग नक्षत्र असणाऱ्यांसाठी टिप्स
-
दिवसाच्या कामाचे टाईम टेबल आखावे.
-
प्रत्येक काम लक्षपूर्वक करावे.
-
अति रिलॅक्स मूडमध्ये काम करू नये.
-
बाहेर फिरायला जाताना सोबतच्या मंडळींच्याही मतांचा विचार करावा.
-
सार्वजनिक जीवनात मिळून-मिसळून रहावे.
-
स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवण्याचा अट्टाहास नको.
-
खवय्येपणाला थोडी मुरड घालावी.
-
सोबतच्या लोकांच्या चांगुलपणाचे कौतुक करावे
******
मिथुन राशीतील मृग आर्द्रा पुनर्वसु नक्षत्र असणाऱ्यांसाठी टिप्स
-
प्रत्येक वेळी फायदा तोट्याचा विचार टाळावा
-
समोरील व्यक्तीच्या ज्ञानाचा पूर्ण आदर ठेवून संवाद साधावा
-
आपली भूमिका पटवून देताना समोरची व्यक्ती दुखावणार नाही याची काळजी घ्यावी
-
फक्त फायदा-तोट्याचा विचार करून नाती जोडू अथवा तोडू नये
-
न विचारता कुणालाही सल्ला देऊ नये
-
एखाद्या विषयाची पूर्ण माहिती नसल्यास अपूर्ण माहितीवर उसन्या आत्मविश्वासाने बोलू नये
-
फायद्या-तोट्याच्या पलिकडे जाऊन नाती सांभाळावीत