तुमची रास तूळ, वृश्चिक किंवा धनु आहे? मग हे वाचाच
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्यात छोटे छोटे बदल फार महत्त्वाचे असतात. आपल्या राशीप्रमाणे हे बदल कसे करावे, याच्या टिप्स पुढीलप्रमाणे…
जर आपली तूळ रास चित्रा स्वाती किंवा विशाखा नक्षत्र असेल तर
-
आपण थोडे व्यावहारिक व्हायला हवे.
-
प्रत्येक वेळी भावनिक होऊन चालणार नाही.
-
प्रत्येक गोष्टीकडे आपण लॉजिकली पाहिले पाहिजे.
-
केवळ ऐकीव माहितीवर कोणाबद्दल गैरसमज करू नये.
-
केवळ एकाच प्रकारच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता उत्पन्नाची साधने आपण वाढवली पाहिजे.
-
आपल्या संबंधातील प्रत्येकाच्या पसंतीला पण पुरेपूर उतरले पाहिजे हा अट्टाहास नको
-
पंडित दिनेश पंत
इ मेल – Siddhithombare07721@gmail.com
********
-
जर आपली वृश्चिक रास विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्र असेल तर
-
आपण आपल्या त्वरित पण कठोर प्रतिक्रिया देण्याच्या स्वभावाला थोडी मुरड घातली पाहिजे.
-
आपला सर्वच ठिकाणी स्पष्टवक्तेपणा इतरांना योग्य वाटेल असे समजू नये.
-
आपला स्वभाव ही आपली अडचण ठरू नये याची काळजी घ्यावी.
-
कुणाच्याही पाठीमागे त्याची चर्चा करू नये, आपल्याबद्दल निश्चित गैरसमज होईल.
-
समोरच्या एक चुकीबद्दल आपण दोन चुका करून त्याला अद्दल घडवण्याचा प्रकार करू नये.
******
जर आपली धनु रास मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा नक्षत्र असेल तर
-
आपण कोठे बोलावे व कोठे मौन पाळावे त्याचे टेक्निक शिकून घ्यावे.
-
व्यवहार हा व्यवहार याच पद्धतीने करावा. शक्य तिथे टर्म्स अँड काँडिशन्स ठरवून घ्यावे.
-
इतरांच्या भूमिकेचाही आदर करावा.
-
साधक-बाधक माहितीवर कुणाबद्दलही आपले मत बनवणे घाईचे होईल.