करचुकवेगिरीमुळे केंद्राची कारवाई
नवी दिल्ली ः सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची करचुकवेगिरी केल्या प्रकरणी जीएसटी अन्वेषण महासंचालनालयाने तीन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. फोर्च्युन ग्राफिक्स लिमिटेड, रीमा पॉलिकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि गणपती एन्टरप्रायझेस, या त्या तीन कंपन्या आहेत. कोणताही माल पुरवठा न करताच त्यांनी पावत्या तयार केल्याचे आढळून आले आहे. यापुढेही अशा प्रकारच्या उद्योगांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे.