नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात मुख्य मुद्दा आहे तो तिन्ही कृषी कायद्यांचा. हे कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे तर तेवढे सोडून बोला, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. यामुळे मोठा तिढा निर्माण झाला आहे. अखेर यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसह सर्वांना हात जोडून एक विनंती केली आहे. मोदी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत या तिन्ही कृषी कायद्यासंदर्भात सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन करणारे भाषण केले आहे. मी आपल्यास नम्रपणे विनंती करतो की, आपण हे भाषण नक्की ऐकावे, असे मोदी यांनी केले आहे.
बघा कृषी मंत्र्यांचा हा व्हिडिओ
कृषि मंत्री श्री @nstomar जी ने राज्यसभा में कृषि सुधार कानूनों से जुड़े प्रत्येक पहलू को लेकर विस्तार से जानकारी दी है। मेरा विनम्र निवेदन है कि उनकी यह स्पीच जरूर सुनें। https://t.co/OUFrW7BfKo
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2021