नाशिक – जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ६ ऑक्टोबर रोजी ‘ताल भवताल’ हा वाचन प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. गौरी रामनारायण या नाट्यकर्मी आणि समीक्षक असून त्यांनी लिहिलेले ‘Past Forward’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद उल्का राऊत यांनी केला आहे. ‘आमचे बालपण’ या नावाने तो पुस्तकरूपात प्रदीप चंपानेरकर यांनी रोहन प्रकाशनतर्फे वाचकांसमोर आणला आहे. थोर गायिका, भारतरत्न एम.एस. सुब्बलक्ष्मी, जागतिक दर्जाचे बंडखोर चित्रकार एम.एफ.हुसेन आणि नर्तक केलुचरण महापात्रा यांनी स्वतः लिहिलेले त्यांच्या बालपणीच्या भवतालातील अनुभव वाचनासाठी निवडले आहेत. नाटकघर, पुणेची ही निर्मिती असून रावी मोशन पिक्चर्स तर्फे सादर होत आहे. पर्ण पेठे, अतुल पेठे आणि गजानन परांजपे वाचन करणार आहेत. व्हिडीओ जयेश आपटे यांनी तयार केले असून जयंत भीमसेन जोशी यांनी भित्तिचित्रांची संरचना केली आहे. रोहिणी पेठे आणि कुमार गोखले, आदित्य राहणे, शुभम जोशी यांचे साहाय्य आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रेक्षकसंख्या मर्यादा केवळ ४० असून लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधावा. सदर कार्यक्रम आर्किटेक्ट संजय पाटील यांचे ऑफिस, एनव्हायरन प्लॅनर्स, २९/३०, पूर्णवाद नगर, आकाशवाणी जवळ, गंगापूर रोड येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ९८२२५४०४३० या क्रमांकावर संपर्क साधावा.