नवी दिल्ली – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका जवळपास सगळ्यांच्याच आवडीची आहे. त्यामुळे यातील कलाकारांना फारच लोकप्रियता मिळताना दिसते. या मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी निधी भानुशाली सध्या फार चर्चेत आहे.
निधीचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात निधीने बिकिनी घातली असून ती एका बीचवर आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
हे फोटो निधीने काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. सध्या निधी या मालिकेत काम करत नाही. तिच्या जागी पालक सिंधवानी ही भूमिका करते आहे.