मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय या मालिकेतील माधवी भाभी अर्थात अभिनेत्री सोनालिका जोशी यांचे बालपण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे गेले आहे. त्याबाबत नांदगावचे जेष्ठ पत्रकार विजय चोपडा यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कवी पदमाकर कांबळे हे सोनालीचे वडील नांदागाव येथे स्टेट बँकेत हेड कॅशिअर म्हणून कार्यरत होते. १९८०-८५ चा हा कालावधी शहरात पाटील गल्लीत हे कांबळे परिवार राहत होते. या काळात माधवी लहान होती. या कालावधीत सौ प्रतिभा व पद्माकर हे दोघेही जेव्हा पुरुषांना दिवस जातात हा विनोदी काव्य मैफलचा कार्यक्रम सादर करीत असत. माधवी चे बालपणीचे नाव सोनू होते. खूपच गोडसर व सर्वांचीच लाडकी अशी ही माधवी. कवी कांबळे आमच्या सर्वांचे स्नेही. आजही सोनालीशी व कांबळे परिवाराशी स्नेह कायम आहे. सोनालीने नांदगाव व नस्तनपूरला येण्याचेही कबुल केले असल्याचे चोपडा यांनी सांगितले.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका टीआरपीमध्ये नेहमीच वरच्या स्थानावर असते. यातील कलाकार प्रेक्षकांना नेहमीच जवळचे वाटतात. त्यामुळेच त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. या मालिकेतील माधवी भाभी अर्थात अभिनेत्री सोनालिका जोशी हिने तिच्या खऱ्या आयुष्यातील पतीची तिच्या चाहत्यांना ओळख करून दिल्यानंतर बातमी आली. त्यानंतर नांदगावच्या आठवणी चोपडा यांनी जाग्या केल्या. माधवी भाभी ही या मालिकेतील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा. ती सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर तिचे २ लाखांहून अधिक चाहते आहेत. सोनालिकाने नुकताच तिचा आणि तिचे पती समीर जोशी यांचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर याबाबतची बातमी इंडिया दर्पणमध्ये आली. त्यानंतर चोपडा यांनी ही वेगळी माहिती दिली.