चेन्नई – तामिळनाडू विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सध्या सुरू आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्यात प्रचाराचाा धुराळा उडाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रोड शो सध्या चेन्नईत सुरू आहे. या रोड शो ला नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे देशाच्या सर्वच भागातून कोरोनाचे भयावह आकडे येत असताना प्रचारासाठी एवढी गर्दी जमल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, सोशल मिडियात याचे मोठे पडसाद उमटत आहेत. गृहमंत्री शहा आणि भाजप उमेदवार खुशबू सुंदर यांच्या प्रचारासाठी हा रोड शो करण्यात येत आहे. खास म्हणजे, शहा आणि खुशबू यांनी मास्क घातलेला नसल्यानेही सोशल मिडियात टीका केली जात आहे.
बघा, या रोड शो चा व्हिडिओ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!