नंदुरबार ः तापीकाठच्या गावांना ७२ तासांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी काठ परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील जलसाठा लक्षणीयरित्या वाढत आहे. सायंकाळी ७ पासून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळेच हतनूर, सुलवाडे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाणार आहे. नागरिकांनी नदीकाठी जावू नये, गुर-ढोरे नदीकाठी नेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.