इंदिरानगर – येथील रहिवासी निवेदिता पगार (धारराव) यांनी ताज इव्हेंट पॅगीअंट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मिसेस इंडिया स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. गोवा येथील बेवॉच रिसॉर्ट येथे ही स्पर्धा पार पडली. धारराव यांना गोल्ड आणि मिसेस इंडिया ब्रेन विथ ब्युटी या गटात विजेतेपद मिळाले.
गायक यश वडाली,पिया रॉय आणि दिग्दर्शक राकेश सबरवाल हे परीक्षक होते.त्यांच्याच हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. सौ. धारराव यांनी २०१९ मध्ये समीज्ञा फाउंडेशन तर्फे आयोजित सौंदर्य स्पर्धेत मिसेस महाराष्ट्र तर गत वर्षी देखील मिसेस वेस्ट इंडिया सौंदर्य स्पर्धेत बेस्ट रेडियन्स किताब जिंकला होता.वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संतोष धारराव यांच्या त्या पत्नीआहेत.कुटुंब आणि संसार सांभाळत देखील आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कधीही यश मिळवू शकतात.हा संदेश गृहिणींना देण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाले होते.अशी प्रतिक्रिया सौ धारराव यांनी व्यक्त केली आहे.