आई व मुलाला जीवे मारल्याचे प्रकरण
ठाणे ः जिल्ह्यातील कल्याण येथे आई आणि मुलाला जीवे मारल्याप्रकरणी एका तांत्रिकासह तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. ही दुर्घटना कल्याण तालुक्यातल्या आटळी येथे घडली होती. सत्तर वर्षाची महिला आणि त्यांचा पन्नास वर्षाचा मुलगा यांच्यात दुष्ट शक्ति असल्याच्या संशयावरुन दोघांना जबर मारहाण झाली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका तांत्रिकासह बळींच्या दोघा नातेवाईकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी, आरोपींवर कलम ३०२ तसंच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवी प्रथा व जादूटोणा उच्चाटण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीसांनी आज दिली.