सांगली – नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ४३ कोटी रुपयांच्या सोने तस्करी संदर्भात जिल्ह्यातील आटपाडी येथे सीमाशुल्क आणि केंद्रीय जीएसटी पथकाने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.
तीन दिवसापूर्वी नवी दिल्ली रेल्वे स्थानका वरून आठ जणांनी ४३ कोटी रुपयांची जवळपास ८४ किलो वजनाची ५०४ सोन्याची बिस्किटे महसूल गुप्तचर (डी.आर.आय) अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. या गुन्ह्याच्या तपासातून सोनेतस्करीच मोठ रॅकेट उघडकीस येईल, असा विश्वास डी आर आय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र त्यांनी याबाबतचा तपशील द्यायला नकार दिला आहे.