दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील ग्रामपंचातच्या सरपंचपदी अजय चारोस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तळेगाव येथील सरपंच माधव चारोस्कर यांच्या आकस्मिक निधनाने सरपंच पद रिक्त असल्याने रिक्त जागेच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दिलेल्या निर्धारित वेळेत अजय चारोस्कर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी बाबासाहेब खेडकर व ग्रामसेवक एस.वाय.बत्तीसे यांनी काम बघितले .अजय चारोस्कर यांची बिनविरोध निवड होताच ग्रामपंचायती तर्फे नवनिर्वाचित सरपंच अजय चारोस्कर यांचा शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी सरपंच पुष्पाताई पालवे, माजी उपसरपंच बाळासाहेब चकोर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागाबाई भोई ,सिंधु जाधव , ज्येष्ठ नागरिक छबु चकोर, दौलत ढाकणे, माजी सरपंच दत्ताञय ढाकणे ,पोलिस पाटील रोशन परदेशी ,सौ. मंजुषाताई रामरावपतील चौधरी विविध सहकारी संस्थेचे माजी चेअरमन शाम पररदेशी , पुंजाराम पालवे, शिवतेज मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळु चारोस्कर ,राघोजी भांगरे सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम बेंडकुळे ,सुरेश जाधव ,बाबुराव कथार ,निवृत्ती चारोस्कर ,गोविंद चारोस्कर ,सागर भवर ,अरूण मोरे ,आकाश चारोस्कर ,नाना चारोस्कर ,व ग्रामपंचायत कर्मचारी व्ही.एस.बेंडकुळे ,एस.बी.चारोस्कर ,दिलीप चारोस्कर ,समाधान चौधरी आदी उपस्थित होते.








