मालेगाव – राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत तळवाडे धरणाच्या पाणी पुरवठा योजनेतून दाभाडी गावात आज पाण्याची गंगा आली आहे, येथून पुढे विकासाची गंगा वाहील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
तालुक्यातील दाभाडी येथे तळवाडे धरणाच्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण व विविध विकास कामांच्या शुभारंभा प्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी प्र.सरपंच सुभाष नहिरे, जि.प.सदस्य संगिता निकम, पं.स.सदस्य कमळाबाई मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन राजेंद्र जाधव, मनोहर बच्छाव, संजय दुसाणे, प्रमोद निकम, शशिकांत निकम, डॉ.एस.के.पाटील, निळकंठ निकम यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीच सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या वर्षपूर्ती निमीत्त विविध विकास कामांच्या शुभारंभासह लोकार्पण करतांना विलक्षण आनंद होत असल्याचे सांगत मंत्री श्री.भुसे म्हणाले. १२ गांव पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करतांना विशेषत: महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझी वचनपूर्ती झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज भुमीपूजन केलेली सर्व कामे दर्जेदार पध्दतीने झाली पाहिजे असे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. पुढील वर्षभरात गावातील विकास कामांमुळे गावाचा नक्कीच विकास होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर गावातील अतिक्रमीतांची घरे नियमनाकूल करण्याचे आवाहन करत गावातील गट शेतीच्या माध्यमातून शेतमालासाठी गोडावून व कोल्ड स्टोरेजच्या निर्मीतीसाठी मोठा निधी उभारण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी डॉ.एस.के.पाटील यांनी आदर्शग्राम पंचायतीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून मनोगत व्यक्त केले. तर निळकंठ निकम यांनी गावकऱ्यांना सर्व मुलभूत भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रमोद निकम यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
सर्वप्रथम राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते दाभाडी रोकडोबा नगर स्मशान भुमी शेड व बैठक व्यवस्था, दाभाडी गाव अतंर्गत रस्ता व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील समाज मंदीर शेडचे भुमीपूजन करण्यात आले. राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या वचनपूर्ती सोहळ्याचे सुत्रसंचलन अमोल निकम यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भावना निकम, सोनाली निकम, आशाबाई निकम, सुरेखा मानकर, विद्या निकम, आक्काबाई सोनवणे, संगीता गायकवाड, शरद देवरे, अविनाश निकम, विशाल निकम, दादाजी सुपारे, अंताजी सोनवणे, भिकन निकम, अमृत निकम, संजय निकम आदि उपस्थित होते.