दिंडोरी – राष्ट्रीय भूमी अभिलेख (एन. एल.आर.एम.पी) ही वेबसाईट गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद आहे. ती त्वरीत व कायमस्वरूपी चालू व्हावी यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने ऑनलाईन सेवा चालू केली असली तरी त्यासाठी लागणारे इंटरनेट सेवा मात्र चांगल्या प्रतीचे दिले नाही त्यामुळे डिजिटल सेवा लोकांना डोकेदुखी तर ठरत नाही ना असा संशय व्यक्त करावा लागत आहे. शेतकरी खातेदार तलाठी कार्यालयात सातबारा उतारा मिळण्यासाठी चकरा मारतात परंतु साईड बंद असल्याने उतारे मिळत नसल्यामुळे तलाठी यांना शेतकरी खातेदारांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. तलाठी यांचे सर्व कामे संगणकीय ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत.
मागील आठ दिवसापासून ई-फेरफार सह सर्वच साईटचा स्पीड नाही. तसेच ३ ऑक्टोबर पासून साईट पूर्णता बंद आहे. यात पुढील दोन दिवसात सुधारणा होणे कामाच्या दृष्टीने गरजेचे आहे. असे न झाल्यास तलाठ्यांना लोकांच्या रोषापासून वाचण्यासाठी सर्व तलाठी यांची डीजीटल सिग्नीचर तहसील कार्यालयात जमा करावे लागतील. त्यास तलाठी जबाबदार राहणार नाही याची नोंद तहसिल कार्यालयाने घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मासिक वेतनाबाबत अडचणी, ७ वा वेतनआयोग पडताळणीबाबत , पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना गावे वाटप करून देनेस विनंती जेणेकरून कामाचा वेग आणि अचूकता येईल. अशा मागण्यांच्या आशयाचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस आबासाहेब खेडकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार गोसावी, उपाध्यक्ष डी.बी.केसरे, सरचिटणीस किरण भोये, संघटक शरद गोसावी, तालुका संपर्क प्रमुख महेश भोये, शिवाजी भोये आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.